SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्यांवर उपाययोजनांसाठी संयुक्त कृती आराखडा राबविणारकोल्हापूर महानगरपालिका : 27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभनालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणीमहाकाली मंदिर परिसरात चालणारा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्तः ३८,८०० चा मुद्देमाल जप्त; पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : लोकशाही दिनी 86 तक्रार अर्ज दाखलबांबवडे येथे शुक्रवारी रोजगार मेळावाहिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत विविध जनजागृती उपक्रमकोरे अभियांत्रिकी मध्ये पीबीएल दिन उत्साहात संपन्नसह्याद्री ते हिमालय: ‘कोल्हापूर हायकर्स’ची पवित्र जल संकलन मोहीम संपन्न'द लिजंड' राज कपूर यांच्या स्मृतींना उजाळा; कोल्हापुरातील स्मारकाच्या सुशोभीकरणाची मागणी

जाहिरात

 

कोल्हापूर : लोकशाही दिनी 86 तक्रार अर्ज दाखल

schedule02 Jun 26 person by visibility 88 categoryराज्य

▪️प्रलंबित अर्जांबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या कडून आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'लोकशाही दिन' आज मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले तसेच प्रलंबित असलेल्या अर्जांचा आढावा घेतला. आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण 86 नवीन अर्ज प्राप्त झाले.

जास्त कालावधीसाठी प्रलंबित अर्ज असणाऱ्या विभागांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहेत. लोकशाही दिनास सर्व शासकीय आस्थापनांनी हजर राहण्याचे निर्देश देत त्यांनी गैरहजर विभागांना नोटीस बजावण्यात यावी अशा सूचना केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes