बांबवडे येथे शुक्रवारी रोजगार मेळावा
schedule02 Jun 26 person by visibility 139 categoryसामाजिक
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (स्मॅक) आणि सुराज्य फौंडेशन, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 5 जून रोजी सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत ज्ञानराज मंगल कार्यालय, टर्निंग पॉईंट, वारणा दुध शित केंद्रासमोर, बांबवडे येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 21 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सुमारे 750 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. या पदांकरीता किमान 08 वी, 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले.