SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्यांवर उपाययोजनांसाठी संयुक्त कृती आराखडा राबविणारकोल्हापूर महानगरपालिका : 27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभनालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणीमहाकाली मंदिर परिसरात चालणारा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्तः ३८,८०० चा मुद्देमाल जप्त; पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : लोकशाही दिनी 86 तक्रार अर्ज दाखलबांबवडे येथे शुक्रवारी रोजगार मेळावाहिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत विविध जनजागृती उपक्रमकोरे अभियांत्रिकी मध्ये पीबीएल दिन उत्साहात संपन्नसह्याद्री ते हिमालय: ‘कोल्हापूर हायकर्स’ची पवित्र जल संकलन मोहीम संपन्न'द लिजंड' राज कपूर यांच्या स्मृतींना उजाळा; कोल्हापुरातील स्मारकाच्या सुशोभीकरणाची मागणी

जाहिरात

 

नालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

schedule02 Jun 26 person by visibility 125 categoryगुन्हे

कोल्हापूर : शहरातील पावसाळापूर्व नालेसफाई कामाचा आज स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी प्रत्यक्ष जगेवर जाऊन आढावा घेतला. यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, माजी नगरसेवक अभिजीत मोकाशी, विनायक फाळके, नगरसेविका पुर्वा राणे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार उपस्थित होते.

महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख व उपनाल्यांची पोकलॅन्ड, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने साफसफाई करण्यात येत आहे. या कामांचा आढावा घेताना उपआयुक्त परितोष कंकाळ यांनी आजअखेर पूर्ण झालेल्या नालेसफाईची माहिती सभापतींना दिली. यानंतर हुतात्मा गार्डन व शाम सोसायटी परिसरातील सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी सभापती विशाल शिराळे यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शुक्रवारी स्थायी समितीमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शाम सोसायटी येथील नाल्याची पाहणी करुन या ठिकाणी अडवलेल्या पाण्यामुळे ओव्हरफ्लोची समस्या निर्माण होत असल्याने स्वतंत्र पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच नाल्यामध्ये काही नागरिकांनी केलेली भर तातडीने पोकलॅन्डच्या सहाय्याने हटविण्यास सांगितले. त्याप्रमाणे तात्काळ या ठिकाणी पोकलॅन्डच्या सहाय्याने भर हटविण्यात आली. याशिवाय नाल्यामधून गेलेली ड्रेनेज पाईपलाईन खराब झालेली असल्याने ती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश ड्रेनेज विभागाला देण्यात आले. नाल्यात साचलेला गाळ व केंदाळ त्वरित काढून घेण्याच्या सूचनाही मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या.

पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याच्या घटना टाळण्यासाठी नालेसफाईची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यात येत असून, नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा अथवा माती टाकू नये असे आवाहन सभापती विशाल शिराळे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes