SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्प

जाहिरात

 

सोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!

schedule17 Oct 26 person by visibility 112 categoryराजकीय

◼️विविध शैक्षणिक संस्थांना भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक संवाद, श्री काशीपीठ बृहन्मठात शिवाचार्य महाराजांचे आशीर्वाद

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, शाळा आणि शैक्षणिक संकुलांना भेटी देत शिक्षकांशी संवाद साधला. या दौऱ्यात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या या संवाद दौऱ्याला शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सोलापूर येथील श्री काशीपीठ बृहन्मठात श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांची कौस्तुभ गावडे यांनी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. महाराजांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला भेट देऊन त्यांनी शिक्षक बंधू-भगिनींशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि महिला शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांविषयी त्यांनी माहिती घेतली. शिक्षकांचे हे प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, खजिनदार बापूसाहेब शितोळे, सचिव पी. टी. पाटील, सोलापूर जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष रणवीर राऊत, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि बार्शी शहर भाजपचे शहराध्यक्ष महावीर कदम यांच्यासह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

या दौऱ्यात ब्रह्म होटगी महाराज शैक्षणिक संकुल, आसावा दयानंद हायस्कूल, नीलकंठेश्वर हायस्कूल तसेच द मॉडेल विविधांगी प्रशाला व महाविद्यालय येथे भेटी देण्यात आल्या. या भेटींदरम्यान शिक्षकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा, शैक्षणिक अडचणी आणि संस्थांसमोरील विविध प्रश्न समजून घेण्यात आले. शिक्षकांचे हक्क, सन्मान आणि शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार गावडे यांनी व्यक्त केला. ब्रह्महोटगी महाराज शैक्षणिक संकुलात मुख्याध्यापक ढाले सर उपस्थित होते.

दरम्यान, भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी ज्येष्ठ नेते आमदार  सुभाष बापू देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि प्रचाराच्या पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
शिक्षकांशी थेट संवाद, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका, या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राशी संवाद अधिक दृढ करण्यावर भर दिला. शिक्षकांचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार या दौऱ्यातून त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes