SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्प

जाहिरात

 

कौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री

schedule17 Oct 26 person by visibility 192 categoryशैक्षणिक

◼️घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात

कोल्हापूर : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे, संशोधन व नवोन्मेषाला प्राधान्य देणे आणि अपयशाची भीती न बाळगता नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समस्या निवारणाच्या क्षमतेच्या बळावर विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर नेतृत्व करावे, असे प्रतिपादन भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नागपूरचे संचालक प्रा. डॉ. भीमराया मेत्री यांनी केले.

   अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात हा समारंभ पार पडला.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाचा वार्षिक प्रगती अहवाल सादर करत विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.या सोहळ्यात विविध विद्याशाखांतील ९६० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदव्या, तर १५ संशोधकांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

 समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून गोवा सरकारच्या राज्य उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ मुगेराया उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी भूषविले. डॉ. मुगेराया यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग समाजातील विविध घटकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि लोककल्याणासाठी करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

 अध्यक्षीय भाषणात  संजय घोडावत यांनी पदवीधरांचे अभिनंदन करून ते म्हणाले, यशाची शिखरे गाठताना उत्तम चारित्र्य, सचोटी आणि सामाजिक भान जपणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. 

  समारंभात इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

 या वेळी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. एम. इंगळे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, पदवीधर विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes