SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्प

जाहिरात

 

पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

schedule17 Oct 26 person by visibility 224 categoryराजकीय

◼️मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देत मतदानाचे आवाहन

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देत मतदान करण्याचे आवाहन केले.

या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपचे कोल्हापूर शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे आणि आप्पा लाड उपस्थित होते.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, चंद्रकांतदादा पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देऊन मतदान करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes