केआयटी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्र
schedule01 Aug 25 person by visibility 239 categoryशैक्षणिक

▪️अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांचे केआयटीला प्राधान्य
कोल्हापुर : येथे केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय उच्च शैक्षणिक दर्जा असणारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये देखील महाराष्ट्र राज्या बरोबरच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी केआयटी च्या दर्जेदार शैक्षणिक परंपरेवर विश्वास ठेवून महाविद्यालयात प्रवेशासाठी पसंती दर्शवलेली आहे.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतून पहिले दोन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आयान शेख व विद्यार्थिनी प्रनोति तिबिले आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, " ४२ वर्षांची शैक्षणिक परंपरा,१०० % प्लेसमेंट त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेसाठी सहकार्य करणाऱ्या अशा महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळत आहे हे आमचे भाग्य आहे. अशा पर्यावरण पूरक महाविद्यालयाच्या प्रांगणातून आम्ही नक्कीच समाजाभिमुख काम करणारे अभियंते होऊ असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानिमित्ताने संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी म्हणाले," काल सुसंगत अभ्यासक्रम सकारात्मक तसेच आधुनिक वातावरण , इनोव्हेशन व उद्योजकतेच्या कॉलेजच्या प्रयत्नांना राज्य व केंद्र सरकारकडून दिले जाणारे आर्थिक पाठबळ या केआयटीच्या मोठ्या जमेच्या बाजू ठरत आहेत.”
९ अभ्यासक्रमातून प्रथम वर्षात जवळपास १३०० विद्यार्थी विद्यार्थिनीना प्रवेश देण्याची क्षमता आहे. ४ कोअर अभ्यासक्रम व ५ सर्किट अभ्यासक्रमा च्या माध्यमातून विद्यार्थी केआयटी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत असा अंदाज नुकत्याच घोषित झालेल्या पहिल्या फेरीच्या प्रवेश यादी वरून लक्षात येत असल्याचे मत संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी व्यक्त केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण,राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी,कालसापेक्ष अभ्यासक्रम, गतिमान परीक्षा यंत्रणा या व अशा अनेक गोष्टींच्या कारणामुळे यावर्षी देखील १०० % प्रथम वर्षाच्या जागा भरल्या जातील असा विश्वास अधिष्ठाता प्रवेश विभाग डॉ महेश शिंदे यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले ,अन्य विश्वस्त यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.