SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणारराज्यभर गुटखा माफियांचे धाबे दणाणले: १९५ ठिकाणी धाडी, २ कोटींचा मुद्देमाल जप्त! १९२ व्यक्तींना अटकराज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मोसमी पावसाचे राज्यात आगमन, मात्र सर्वदूर सक्रियतेसाठी १५ जूनची प्रतीक्षा; बळीराजाची नजर आकाशाकडे!"डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवडअवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावाकरिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास सहकाराचा इतिहास 'दत्ताजीराव कदमां'शिवाय अपूर्ण; शरद पवारांकडून कार्याचा गौरवदूरशिक्षण केंद्राच्या एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरीचे आयोजन जागतिक अन्न सुरक्षा दिन: सुरक्षित अन्न, निरोगी आरोग्य!

जाहिरात

 

अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

schedule06 Jun 26 person by visibility 243 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील शौचालय व्यवस्था, पार्किंग सुविधा, अतिक्रमणे तसेच भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या विविध सुविधांची आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकाळी 9.30 ला संयुक्त पाहणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंखे तसेच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोंढे आदी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान राजाराम हायस्कूलजवळील पार्किंग जागेची पाहणी करून सदर पार्किंग सुविधा कायमस्वरूपी खुली ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पागा बिल्डिंग येथील सार्वजनिक शौचालय स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

विद्यापीठ हायस्कूलसमोरील परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
महाद्वार रोड, ज्योतिबा रोड व मंदिरालगतच्या परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी दिले. तसेच मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना ये-जा करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मंदिरालगत असलेले फुलविक्रेत्यांचे स्टॉल हटविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

देवस्थान समितीने मंदिर परिसरात अधिक सुरक्षारक्षक नियुक्त करून महाद्वार रोड परिसर मोकळा व सुव्यवस्थित ठेवावा, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी यावेळी दिल्या.

त्याचबरोबर मंदिर परिसरातील अतिक्रमणे 10 जून 2026 पूर्वी स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes