एचव्हीएसीआर क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अपार संधी : योगेश गांधी
schedule23 Apr 26 person by visibility 182 categoryशैक्षणिक
वारणानगर: येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात इशरे (ISHRAE) विद्यार्थी शाखेचा पुनर्स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगेश गांधी यांनी एचव्हीएसीआर म्हणजेच हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग हे क्षेत्र भविष्यात करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कोल्हापूर इशरे चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. अवेसअहमद हुसेनी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन विद्यार्थी शाखेच्या कार्याची अधिकृत घोषणा केली.
या सोहळ्यात डॉ. वंदना पुसाळकर यांनी ब्लू-ग्रीन सिनर्जी या विषयावर विशेष व्याख्यान दिले, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजीनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत फॅकल्टी अॅडव्हायझर प्रा. आतिश चव्हाण यांनी केले, तर आभार विद्यार्थी अध्यक्षा सलोनी पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.