विद्यार्थ्यांसाठी ई - लायब्ररीस प्रारंभ
schedule23 Apr 26 person by visibility 118 categoryराज्य
कोल्हापूर : भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह क्रमांक - 2 येथे विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष अर्थात ई - लायब्ररीचे उद्घाटन गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले .अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर होते.या ई - लायब्ररीस प्रारंभ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत होईल .
याप्रसंगी अधीक्षक केशव पांडव, दिलीप सांगावकर , नितीन आवळे ,आशा रावण , निरिक्षक अतुल पवार यांच्यासह वसतीगृहातील इतर विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .