SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडएचव्हीएसीआर क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अपार संधी : योगेश गांधीविद्यार्थ्यांसाठी ई - लायब्ररीस प्रारंभक्रीडा प्रबोधनी प्रवेश - 27 एप्रिलपासून निवड चाचणीचे आयोजन कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपदमहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवसकोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी यांची निवडपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यम

जाहिरात

 

कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपद

schedule23 Apr 26 person by visibility 134 category

कागल : येथील डी आर माने महाविद्यालय येथे अनुज् चेस ॲकॅडमीच्या वतीने आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. ९ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील खुला गट अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या पार्थ सुतार याने ९ वर्षांखालील वयोगटात आपल्या बुद्धीची चुणूक दाखवत ४ पैकी ३.५ गुण मिळवले आणि प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद आपल्या नावावर केले.

पार्थच्या या यशाबद्दल शाळेत आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विलास सासमिले यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. या यशासाठी पार्थला अनुज् चेस ॲकॅडमीचे प्रशिक्षक बाबूराव पाटील, शाळेचे प्राचार्य डॉ. विलास सासमिले आणि क्रीडा शिक्षिका अश्विनी गाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 पार्थच्या या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर  शिल्पा पाटील यांनी त्याचे कौतुक केले असून शाळेतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes