SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन: समान कामासाठी समान वेतन का गरजेचे?संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे (डे-बोर्डिंग) प्राचार्य अस्कर अली यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कारडी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेशईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १०० टक्के नोंदणीसाठी मोहीमकोल्हापूरचे नगरसेवक आश्किन आजरेकर आणि राज कोरगावकर यांनी मुंबईतील ‘हायरॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश!गौरी-गणपती विसर्जन मार्गांवर महापालिकेचे युद्धपातळीवर पॅचवर्कसेवा संकल्प अभियांनातर्गत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची बेघर निवारा केंद्रांना भेटगोकुळची निवडणूक बिनविरोध होणे अशक्यच! मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; दूध संघाच्या राजकारणावर स्पष्टोक्तीहुपरीत साकारणार ६०० कोटींचा देशातील पहिला 'झिरो वेस्ट' बहुराज्यीय प्रकल्प; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी होणार पायाभरणी९० दिवसांचा अल्टिमेटम अन् थेट मुंबईत धडकण्याचा इशारा; जरांगे पाटलांचे उपोषण सुटले, पण लढा सुरूच!

जाहिरात

 

कोल्हापूरचे नगरसेवक आश्किन आजरेकर आणि राज कोरगावकर यांनी मुंबईतील ‘हायरॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश!

schedule17 Sep 26 person by visibility 639 categoryक्रीडा

कोल्हापूर : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या अत्यंत खडतर अशा 'हायरॉक्स' (HYROX)  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या  आश्किन आजरेकर आणि राज कोरगावकर या जिगरबाज खेळाडूंनी ही स्पर्धा विक्रमी १ तास ३४ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत ८ किलोमीटर धावणे (Running) आणि ८ वेगवेगळे कठीण वर्कआउट्स (Workouts) यांचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट शारीरिक तंदुरुस्तीचे प्रदर्शन घडवले.

हायरॉक्स स्पर्धेपूर्वी आश्विन आज़रेकर यांनी जगातील सर्वात कठीण मानली जाणारी 'आयकॉनिक' आयकन मॅन (Ironman) ट्रायथलॉन स्पर्धा, तसेच डुआथॉन्स आणि अनेक मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यांनी या स्पर्ड साठी रगेसडियन जिम मधे सराव केला आहे. ते एक प्रतिभावान राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू असून, महाराष्ट्र फुटबॉल संघाचे त्यांनी ४ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवले असून, १०० वर्षे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे ते प्रमुख खेळाडू आहेत.

या यशाबद्दल कोल्हापूरच्या क्रीडा वर्तुळातून आणि नागरिकांकडून आश्विन आज़रेकर व राज कोरगावकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes