SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित; डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदाननुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सज्जतेचा आढावाइचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाईपोटी पाच वर्षांत अनुक्रमे ६५७ कोटी, ३९२ कोटी मिळणारसंभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक : पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजनमदर्स डे निमित्त आयोजित स्पर्धेत अजिंक्य विजयकुमार खराडे विजेताकराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा : पालकमंत्री शंभूराज देसाई डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटींग मार्गदर्शन शिबिर संपन्न ... या प्रकरणी बाहेरील संस्थेकडून अथवा व्यक्तींकडून फसवणूक झाल्यास कोल्हापूर महानगरपालिका जबाबदार नाही‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत’ पुरस्काराचे वितरण; वर्षा निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने पुरस्कार स्वीकारलामसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित; ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लाभला पुरस्कार

जाहिरात

 

पणजी येथे हेट्स ऑफ फोर टेल्स डॉग, कॅट शॉपीचे उद्घाटन

schedule25 May 25 person by visibility 282 categoryउद्योग

पणजी : कुंडईकर नगर, पणजी येथे 'हेट्स ऑफ फोर टेल्स' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉग आणि कॅट शॉपीचे उद्घाटन युवा नेते उत्पल मनोहर परिकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शॉपीच्या व्यवस्थापिका के. शिल्पा यांनी उत्पल परिकर यांचे औपचारिक स्वागत केले.

 प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रसाद नार्वेकर, माजी नगरसेविका शिबा नार्वेकर यांचा समावेश होता. उपस्थित सर्वांनी या नव्या शॉपीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
'हेट्स ऑफ फोर टेल्स' हे शॉप डॉग आणि कॅटसाठी विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे फूड, अॅक्सेसरीज, खेळणी आणि आवश्यक उत्पादने उपलब्ध करून देणार आहे. पेट्सप्रेमींसाठी हे शॉप एक नवा अनुभव देईल, असा विश्वास व्यवस्थापिका के. शिल्पा यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या शॉपच्या शाखा खुल्या होणार आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उत्पल परिकर म्हणाले की, "गोव्यासारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे शॉपी उघडल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घेणाऱ्या नागरिकांना मोठा आधार मिळेल. हे शॉपी वेगळी ओळख निर्माण करेल याची मला खात्री आहे." त्यांनी व्यवस्थापक मंडळास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

'हेट्स ऑफ फोर टेल्स' शॉपी आता कुंडईकर नगर येथील पेट्सप्रेमींसाठी खुली झाली असून, या शॉपीमुळे परिसरात प्राणीप्रेमींसाठी एक उत्कृष्ट सेवा उपलब्ध होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes