... या प्रकरणी बाहेरील संस्थेकडून अथवा व्यक्तींकडून फसवणूक झाल्यास कोल्हापूर महानगरपालिका जबाबदार नाही
schedule27 May 25 person by visibility 245 categoryराज्य

* राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कर्ज मागणी अर्ज रुपये शंभर व्यतिरिक्त कोणतेही शुल्क नाही
कोल्हापूर : दिनदयाळ अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत संसाधन संस्था म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे बचत गट स्थापना करणे, कर्ज वितरण करणे वसंगोपन करण्याची जबाबदारी दिलेली होती. यासाठी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषदेसाठी शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. परंतू एप्रिल 2025 पासून या संस्थेकडील कामकाज महानगरपालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान(NULM) विभागाकडे हस्तांतरित झालेले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या या विभागाकडे शहरातील बचत गट स्थापना, संगोपन व कर्ज वितरण केले जाणार आहे. यासाठी कर्ज मागणी अर्ज रु.100/- व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतू महापालिकेच्या नावावर काही खाजगी संस्था व व्यक्तींकडून गटांना अनधिकृत रित्या कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यासाठी त्यांच्याकडून जादा पैशाची मागणी करण्यात येत आहे. यासाठी दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान(NULM) यााविभागातील अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करुन पैशाची मागणी केली जाते.
तरी महापालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM)uविभागाकडून जाहिर आवाहन करण्यात आले आहे कि अधिकृततCRPत(समूह संसाधन व्यक्ती) यांची नेमणूक झालेखेरीज बचत गट स्थापना, कर्ज प्रकरण करण्यात येणार नाहीत.तअश्या प्रकारे पैशाची कोणीही मागणी केल्यास महापालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट येथील चौथा मजल्यावरील दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) यााविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी बाहेरील संस्थेकडून अथवा व्यक्ती कडून पैसे मागणी तसेच महिलांची आर्थिक फसवणूक झाल्यास यासाठी महानगरपालिका कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.