SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : पूर बाधीत क्षेत्रातील 37 मिळकतींना नगररचना विभागाकडून नोटीसाअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलसर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावाश्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यताबकर ईद (ईदुल अजहा) शनिवारी ७ जून रोजी होणारसंजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू : आमदार सतेज पाटीलशेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणीबांबू उत्पादक शेतकऱ्यांनी ''ब्रँड ॲम्बेसिडर" बनून जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहनबंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगितीशिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती

जाहिरात

 

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

schedule27 May 25 person by visibility 266 categoryराज्य

मुंबई/सातारा : कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


मुंबई येथून शासकीय निवास्थानाहून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपाधीक्षक विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग पुणेचे अधीक्षक अभियंता विभुते, तहसीलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कराड-चिपळूण महामार्गावरील राडा-रोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना करुन पालकमंत्री देसाई म्हणाले, या मार्गावरील वाहतुक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात. हे काम येत्या आठ दिवसात करावे, असे निर्देश देऊन प्रांत, तहसीलदार व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कराड-चिपळूण मार्गाची पाहणी करुन उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes