SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे छत्रपती संभाजीनगरचे नवे महापालिका आयुक्तवादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनी बाधित; काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीतकोल्हापूर महापालिकेला आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुण्यात बदली, डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे धुरा!शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने द्या; खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणीकोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची तडकाफडकी बदली; मंत्रालयात हजर होण्याचे 'एकतर्फी' आदेश'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

schedule02 Apr 26 person by visibility 174 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.

 यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाळणा, रुद्राभिषेक व भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या कार्यक्रमास संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील यांच्यासह पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, नितीन तोडकर,सुभाष नाळे, सर्वेश जाधव, अर्जुन पाटील, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व इतर अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes