SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे छत्रपती संभाजीनगरचे नवे महापालिका आयुक्तवादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनी बाधित; काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीतकोल्हापूर महापालिकेला आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुण्यात बदली, डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे धुरा!शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने द्या; खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणीकोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची तडकाफडकी बदली; मंत्रालयात हजर होण्याचे 'एकतर्फी' आदेश'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची तडकाफडकी बदली; मंत्रालयात हजर होण्याचे 'एकतर्फी' आदेश

schedule02 Apr 26 person by visibility 127 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शंकर शिंदे यांची आज राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने गुरुवारी (२ एप्रिल) यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून, शिंदे यांना तातडीने सध्याच्या पदावरून 'एकतर्फी' कार्यमुक्त करण्यात आले आहे.


प्रशासकीय सोय आणि सार्वजनिक हिताचे कारण देत शासनाने ही बदली केली आहे. विशेष म्हणजे, संजय शिंदे यांना कोठे नियुक्त केले आहे, याचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तोपर्यंत त्यांना मुंबईतील महसूल व वन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, त्यांना आजच (२ एप्रिल) दुपारी आपल्या पदाचा कार्यभार सोडून नवीन ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे.

शासनाने या बदली प्रक्रियेत अत्यंत कडक भूमिका घेतली असून, शिंदे यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी वेळेत रुजू न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशात दिला आहे. तसेच, या बदलीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोणतीही रजा मंजूर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या प्रशासकीय वर्तुळात बदल्यांचे वारे वाहत असतानाच, आज थेट शासन आदेश धडकल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता रिक्त झालेल्या अपर जिल्हाधिकारी पदावर शासन कोणाची नियुक्ती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes