SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे छत्रपती संभाजीनगरचे नवे महापालिका आयुक्तवादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनी बाधित; काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीतकोल्हापूर महापालिकेला आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुण्यात बदली, डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे धुरा!शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने द्या; खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणीकोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची तडकाफडकी बदली; मंत्रालयात हजर होण्याचे 'एकतर्फी' आदेश'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

दुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार

schedule02 Apr 26 person by visibility 107 categoryराज्य

कोल्हापूर : मौजे मोघर्डे, ता. राधानगरी हद्दीतील दुधगंगा डावा कालवा कि.मी. 13 सा.क्र. 12/200 मी. येथील नादुरुस्त गेटमुळे पाणी वाया जात असल्याबाबत आपले सरकार पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, संबंधित गेट दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा खुलासा दुधगंगा डावा कालवा उपविभाग क्र. 2, तिटवे यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या अनुषंगाने यांत्रिकी विभाग, कोल्हापूर कार्यालयामार्फत आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गेट दुरुस्तीचे काम करताना झडप द्वार बसविण्यासाठी विद्यमान संधानकाचे बांधकाम काढणे, झडप द्वार बसविणे आणि त्यानंतर बांधकाम पूर्ववत करणे आवश्यक असल्याने सदर कामाचा समावेश दुधगंगा प्रकल्पाच्या सन 2025-26 च्या प्राणसूचीत करण्यात आला होता. या कामास महामंडळाच्या पत्रानुसार 16 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी मिळाली असून, विभागीय कार्यालयाकडून 11 फेब्रुवारी रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे.

संबंधित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांकडून सुमारे 8 ते 10 दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, डावा कालव्यातील सा.क्र. 3/290 येथील CR cum escape च्या hoist arrangement मधील रॉड तुटल्याने गेटमध्ये गॅप निर्माण झाला आहे. तसेच उजवा कालवा सुरू असल्यामुळे डावा कालवा बंद असतानाही सुमारे 100 क्युसेक्सने पाणी वाहत राहते. याशिवाय सा.क्र. 11/940 गैबी येथील CR cum escape गेटची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही ठिकाणच्या गळतीमुळे डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने मुख्य गेट दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.

या सर्व बाबींचा विचार करून संबंधित गेटच्या दुरुस्तीसाठी कालव्यातील पाणी पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याचे उपविभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. स्थापत्य व यांत्रिकी विभागाच्या समन्वयातून तातडीने काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अभियंता उ. सु. माणकापुरे यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes