SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्चधर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शनबाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्न

जाहिरात

 

कोल्हापुरात उद्या होणार 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळा

schedule24 Jul 26 person by visibility 311 categoryसामाजिक

◼️पीपल्स पार्टी ऑफ इंडियातर्फे भव्य आयोजन
कोल्हापूर : सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी देशभरात राबविण्यात आलेल्या 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळा उद्या दिनांक २५ जुलै २०२६ रोजी कोल्हापुरात अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सुरू झालेल्या या महत्त्वाच्या अभियानाचा सांगता सोहळा महाराष्ट्रात होत असून, यानिमित्ताने दुपारी २:०० वाजता महासैनिक दरबार हॉल, सर्किट हाऊस रोड, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य कार्यक्रमात 'एक राष्ट्र: समान शिक्षण आणि लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत प्रतिनिधित्व', महिला सक्षमीकरणासाठी सर्व वर्गातील महिलांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के भागीदारी, तसेच 'राष्ट्रीकरणाचा पैगाम: निजीकरण को लगाम' या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर देशातील आणि राज्यांतील दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन, वंचित, शेतकरी व महिलांच्या उद्धारासाठी आणि सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी करून ज्या कल्याणकारी राज्याची स्थापना केली, त्यांच्या याच विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान अत्यंत प्रभावी ठरले आहे.

या कार्यक्रमास पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) चे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. के. एस. चौहान, महासचिव  हेमराजसिंह पटेल, राष्ट्रीय प्रवक्ते  बी. डी. बोरकर तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी विशेष उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक परिवर्तन आणि संविधानाच्या मूल्यांना अधिक सशक्त करणाऱ्या या ऐतिहासिक महासमापन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes