SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभशालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार; राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभशिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्दकोल्हापूर : जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहनजागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅलीआजरा येथे मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 42 वर्षांचा प्रवास अभिमानास्पद; डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, 43 वा स्थापना दिन उत्साहातराजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कारासाठी करवीरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनकसबा कोडोली नगरपरिषद प्रस्तावावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शासनाला सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश

जाहिरात

 

कोल्हापुरात २२ किलो गांजासह तिघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule19 Jun 26 person by visibility 177 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नशामुक्त अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत उजळाईवाडी (ता. करवीर) येथून २२ किलो गांजासह तीन इसमांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उजळाईवाडी तलावाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत राजकिरण जयवंत मोरे (वय २६), संतोष दिनकर माने (वय ४७) आणि सोमनाथ रघुनाथ मंडले (वय ३६, सर्व रा. ता. पाटण, जि. सातारा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा २२ किलो गांजा, एक कार, एक स्पोर्ट्स बाईक आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १२ लाख १७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 याप्रकरणी गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes