SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तेरवाड येथील आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची तपासणीपर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे: उद्योजिका मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ उद्घाटनदुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणारआंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन: कल्पकतेला आणि मनोरंजनाला सलामवारणा दूध संघामार्फत दीपावली 2026 निमित्त सभासदांना तूप भेटसायबर सुरक्षिततेसाठी जागरूकता आणि सतर्कता आवश्यक : सायबर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचे आवाहन संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ‘एज्युकेशन वर्ल्ड’च्या क्रमवारीत महाराष्ट्रात प्रथम; देशभरात चौदावे 'गोकुळ' मॅडेटनुसार सर्व नेत्यांनी सहकार्य करावे; आमदार सतेज पाटील यांचे आवाहन राजकीय घडामोडींवर भाष्य३१ ऑक्टोबरच्या 'एक दिवसीय धरणे आंदोलना'साठी कोल्हापुरातील शिक्षक-कर्मचारी सज्ज; प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात पेन्शन संघटनेचा एल्गार!कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटन

जाहिरात

 

वारणा दूध संघामार्फत दीपावली 2026 निमित्त सभासदांना तूप भेट

schedule27 Oct 26 person by visibility 327 categoryउद्योग

◼️ 2 नोव्हेंबर पासून वाटप करणार; डॉ. विनय कोरे यांची माहीती

वारणानगर : वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने दीपावली 2026 निमित सभासदांना प्रती वर्षी प्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहीती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. दि 2 ते
 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संबंधित प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्रे व वितरक यांच्यामार्फत संघाच्या सभासदांना तूप वाटप करण्यात येणार आहे

वारणा दूध संघाच्या ज्या अ वर्ग सभासदांनी शेअर पूर्ण केले आहेत व जे उत्पादक दुधाचा गावातील दूध संस्थामार्फत संघास दूध पुरवठा करतात. अशा अ वर्ग सभासदांना, ब वर्ग संस्था सभासदांना व राज्यभरातील क वर्ग ग्राहक सभासदांना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, व दिपावली या सणांना सवलतीचे दरात तूप भेट म्हणून दिले जाते.

वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थाच्याकडे सभासदांना दि. 2 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तूप वितरण केले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक देखील संघाने संबंधीत सर्व दूध संस्थाना पाठविले आहे. कोल्हापूर व परिसरातील अ वर्ग व क वर्ग सभासदांचे तूपाचे स्टेशन रोड कोल्हापूर विक्रि केंद्रातून दि. 2 नोव्हेंबर पासून वाटप सुरु होईल.

◼️सभासदांचे सोईचे दृष्टीने कोल्हापूर येथील अ वर्ग व क वर्ग सभासदांसाठी सभासद यादी क्रमांकानुसार वाटप करणेत येणार आहे.

1) अ वर्ग सभासद यादी क्र. । ते 500 दि. 2 व 3 नोव्हेंबर 2026

2) अ वर्ग सभासद यादी क्र. 501 ते 1188 दि. 4 व 5 नोव्हेंबर 2026

◼️तसेच कोल्हापूर येथील क वर्ग सभासदाना

1) क वर्ग सभासद यादी क्र. 1 ते 500 दि. 6/11/2026 व 7/11/2026

2) क वर्ग सभासद यादी क्र. 501 ते 1000 दि. 8/11/2026 व 9/11/2026

3) क वर्ग सभासद यादी क्र. 1001 ते 1500 दि. 10/11/2026 व 11/11/2026

4) क वर्ग सभासद यादी क्र. 1501 ते 1978 दि. 12/11/2026 व 13/11/2026

या मुदतीमध्ये ज्या सभासदाना तूप घेता आले नाही त्यांना दि. 14 नोव्हेंबर या तारखेस कोल्हापूर विक्रि केंद्रातून तूप देणेची व्यवस्था करणेत आली आहे.

कोल्हापूर येथील अ वर्ग व सर्व क वर्ग सभासदांना या बाबत मोबाईल वरुन व्हटसॅप मेसेज पाठविणेची व्यवस्था केली आहे. सभासदांनी आपले ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप घेवून जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले.

यावेळी संघाचे चेअरमन  एच. आर. जाधव, व्हा. चेअरमन अँड श्री एन. आर. पाटील, सर्व संचालक तसेच फैक्टरी मॅनेजर धनंजय लाड,श्रीधर बुधाले,मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, संकलन व्यवस्थापक डॉ जे.बी. पाटील, असि. मॅनेजर अकौंटस प्रविण शेलार, असि. मॅनेजर मार्केटिंग आर.व्ही. देसाई, प्रितीन बासटवार, सचिन माने, उत्तम कणेरकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes