SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तेरवाड येथील आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची तपासणीपर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे: उद्योजिका मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ उद्घाटनदुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणारआंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन: कल्पकतेला आणि मनोरंजनाला सलामवारणा दूध संघामार्फत दीपावली 2026 निमित्त सभासदांना तूप भेटसायबर सुरक्षिततेसाठी जागरूकता आणि सतर्कता आवश्यक : सायबर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचे आवाहन संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ‘एज्युकेशन वर्ल्ड’च्या क्रमवारीत महाराष्ट्रात प्रथम; देशभरात चौदावे 'गोकुळ' मॅडेटनुसार सर्व नेत्यांनी सहकार्य करावे; आमदार सतेज पाटील यांचे आवाहन राजकीय घडामोडींवर भाष्य३१ ऑक्टोबरच्या 'एक दिवसीय धरणे आंदोलना'साठी कोल्हापुरातील शिक्षक-कर्मचारी सज्ज; प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात पेन्शन संघटनेचा एल्गार!कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटन

जाहिरात

 

सायबर सुरक्षिततेसाठी जागरूकता आणि सतर्कता आवश्यक : सायबर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचे आवाहन

schedule27 Oct 26 person by visibility 362 categoryशैक्षणिक

◼️सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स परिषद उत्साहात
◼️डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये आयोजन

कोल्हापूर : डिजिटल युगात इंटरनेटचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षणासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये २४ व २५ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स २०२६’ परिषदेत ते बोलत होते.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती सुरक्षा शिक्षण व जागरूकता (आयएसईए) प्रकल्पाच्या सहकार्याने, सी-डॅक आणि सर्ट-इन यांच्या सहयोगातून ही परिषद आयोजित करण्यात आली. संस्थेचे संचालक डॉ. अजित एस. पाटील यांनी स्वागत केले. सर्ट-इनचे डॉ. कपिल वानखेडे आणि सी-डॅक, मुंबईचे दिव्यांश बघेल विशेष परीक्षक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन डॉ. वानखेडे यांनी केले.

परिषदेत संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी) या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, युक्तिवाद, राजनैतिक वाटाघाटी आणि ठराव प्रक्रियेत सहभाग घेतला. अभिलाषा अडसूळे, सई आवळे, हृषिकेश शाहणे आणि पार्श्वजीत पाटील यांनी समित्यांचे संचालन केले. अंजिलाह धळाईत हिने आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विभागाचे नेतृत्व केले.

◼️पुरस्कार विजेत्यांचा गौरव
यूएनजीए समितीत एस्टोनियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिभव उमेश बालखंडे याला उत्कृष्ट प्रतिनिधी, निलय कुलकर्णी याला विशेष प्रशंसापत्र, ध्रुव घोरपडे याला विशेष उल्लेख, हनी आदित्य प्रताप सिंग हिला उत्कृष्ट वक्ता आणि ईशा सरदेसाई हिला उत्कृष्ट स्थितिपत्राचा पुरस्कार मिळाला.

यूएनएचआरसी समितीत युनायटेड किंगडमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समीक्षा मंथन गवळी हिला उत्कृष्ट प्रतिनिधी, साई उमेश धुमाळे याला विशेष प्रशंसापत्र, गार्गी जिरगे हिला विशेष उल्लेख, रुतुजा अविनाश पुजारी हिला उत्कृष्ट वक्ता आणि श्रेयस राजेंद्र चोरगे याला उत्कृष्ट स्थितिपत्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुमेरा शेख हिचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ग्रंथेज ओतारी आणि डेटा सायन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख तानाजी पाटील उपस्थित होते.समन्वयक म्हणून  प्रा. अमृत काजवे यांनी जबाबदारी पार पाडली.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील व पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes