SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजराकोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उद्या शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनडी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेटवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिकासीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी हैमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणारपाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद

schedule21 Aug 26 person by visibility 146 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1 मिमी, शिरोळ – 0.3 मिमी, पन्हाळा- 1.6 मिमी, शाहुवाडी- 2.5 मिमी, राधानगरी- 6.2 मिमी, गगनबावडा- 32.3 मिमी, करवीर- 1.4 मिमी, कागल- 4.2  मिमी, गडहिंग्लज- 1.4 मिमी, भुदरगड- 2.8 मिमी, आजरा- 1.9 मिमी, चंदगड- 1.2 मिमी असा एकूण 4.73 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

◼️कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली
  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज व भोगावती नदीवरील- सरकारी कोगे व खडक कोगे असे एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.27 (99 टक्के), तुळशी 3.44 (99 टक्के), वारणा 32.73 (95 टक्के), दूधगंगा 24.72 (97 टक्के), कासारी 2.61 (94 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.61 (96 टक्के), पाटगाव 3.52 (95 टक्के), चिकोत्रा 1.26 (83 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.54 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.24 (100 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (100 टक्के), कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे. 

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18, सुर्वे 19.5, रुई 46.5, इचलकरंजी 45.1, तेरवाड 42,  शिरोळ 33.6, नृसिंहवाडी 30.9 फूट इतकी पाणीपातळी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes