SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजराकोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उद्या शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनडी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेटवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिकासीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी हैमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणारपाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद

जाहिरात

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणार

schedule21 Aug 26 person by visibility 175 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबतची निवेदने शासनापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहे. नागरिकांनी आपल्या विविध प्रश्नांबाबतची लेखी निवेदने घेऊन उपस्थित राहावे. निवेदन सादर करताना हार, पुष्पगुच्छ किंवा इतर सत्कार साहित्य आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील प्रलंबित प्रश्नांची निवेदने या उपक्रमाद्वारे सादर करून ‘सेवा अभियानात’ सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes