SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजराकोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उद्या शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनडी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेटवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिकासीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी हैमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणारपाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद

जाहिरात

 

सीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी है

schedule21 Aug 26 person by visibility 192 categoryराज्य

▪️मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्कसह ‘आयुष’च्या कामांचा घेतला सविस्तर आढावा
         
कोल्हापूर :
"सीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी है," असे म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमधील व ‘आयुष’ अंतर्गत वैद्यकीय सेवा-सुविधांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
​              
 मुश्रीफ  म्हणाले सी. पी. आर. चे नूतनीकरण पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यात शेंडा पार्कमधील ६०० बेडचे जनरल हॉस्पिटल, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे अतिविशेषोपचार हॉस्पिटल असे एकूण ११०० बेडचे संकुल पूर्ण होईल. त्यानंतर कागलमधील ग्रामीण आरोग्य पथकासह मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय तसेच; उत्तुर येथील शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय पूर्ण होतील. चौथ्या टप्प्यात करंबळी ता. गडहिंग्लज येथे आयुर्वेदिक एम्स ही संशोधन संस्था स्थापन होईल. येत्या दोन-तीन वर्षांत अमेरिकेतील ह्युस्टनच्या धर्तीवर सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे भव्य ‘मेडिकल हब’ येथे तयार होईल.            
              
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये कोल्हापूरवासियांसाठी लवकरच आयव्हीएफ, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॅथ लॅब आणि ट्रामा आयसीयू या चार प्रमुख वैद्यकीय सुविधा या विविध सेवा-सुविधांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. शेंडा पार्क येथे साकारत असलेल्या राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील कॉंक्रिटीकरणाचा रस्ता आणि जिमखान्याचे लोकार्पण दसऱ्याच्या दरम्यान केले जाईल. 
        
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथील सूरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आज घेतला.
                
ते म्हणाले, शेंडा पार्क येथील सध्या सुरू असलेल्या काही इमारतींचे 31 मार्च 2027 अखेर लोकार्पण होईल.या लोकार्पणासाठी देशाच्या पंतप्रधान महोदयांना आणण्याचे विचाराधीन आहे. शेंडा पार्कमध्ये सध्या शासनाने सर्कीट बेंचला जी जमीन दिली आहे त्याच्या लगत शिल्लक असलेल्या पाच हेक्टर इतक्या जमिनीबाबतची मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच; सध्या या ठिकाणी सुरू असलेली सर्व बांधकामे कंत्राटदारांनी विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करवीत. त्याचबरोबर मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय,पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारण्यात याव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले .
           
ज्या- ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत त्या त्या ठिकाणी पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष सतर्कता बाळगून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत. उत्तूर येथे सूरु असलेल्या कामांबाबत गती वाढविण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
               
◼️सी.  पी. आर. चा लौकिक राज्यभर.......!
अत्यंत कमी कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने सीपीआरचे नूतनीकरण केल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक विभागाचे कौतुक केले. या नूतनीकरणाबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केल्याचे सांगितले. नागपूरमधील सिविल हॉस्पिटलच्या भेटीतही त्यांनी सीपीआरच्या कामाचा उल्लेख केल्याचे, ते म्हणाले.
           
या बैठकीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, वैद्यकीय उप अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे, शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अभिजीत अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे, उप अभियंता  इंगवले, इलेक्ट्रिक विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती कट्टी, उप अभियंता श्री. बनसोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. सिकनीस, अतिरिक्त कार्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी संबंधित कंत्राटदार उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes