SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"कोल्हापूरच्या हद्दवाढीवर निर्णय घ्या, ...": आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली सरकारची कोंडी!राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटनशिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदेकळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहनबोगस डॉक्टरांचे आता खैर नाही! 'नो युवर डॉक्टर' क्यूआर कोड स्कॅन करा आणि तपासा; हसन मुश्रीफ यांचा इशाराआरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागेशाहू जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रंगणार 'महा रक्तदान शिबिर'; खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होणार उद्घाटनकोल्हापुरात धक्कादायक घटना: माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्यास्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शन

जाहिरात

 

शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा

schedule24 Jun 26 person by visibility 170 categoryराज्य

शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून  तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे ग्रामपंचायतींना स्वतःची सुसज्ज व प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारता येणार असून ग्रामस्थांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. 

 बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये यड्राव, कुटवाड, तमदलगे, अर्जुनवाड आणि घालवाड या पाच ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. एकूण १ कोटी २५ लाख रुपयांच्या या निधीमुळे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची केंद्रबिंदू संस्था मानली जाते. अनेक गावांमध्ये प्रशासकीय कामकाजासाठी पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. नव्या इमारतींमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि लोकाभिमुख होणार असून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळणार आहेत.

या निधी मंजुरीबाबत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes