कोल्हापुरात धक्कादायक घटना: माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या
schedule24 Jun 26 person by visibility 977 categoryगुन्हे
कोल्हापूर: जुना बुधवार पेठ येथील सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रौनक इंद्रजीत आडगुळे असे या मृत तरुणाचे नाव असून, तो कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर अँड. महादेवराव आडगुळे यांचा नातू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रौनक एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तो आपल्या खोलीत झोपायला गेला होता. मात्र, बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे आडगुळे कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली असून, लक्ष्मीपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. रौनकच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.