SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मानशासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर​'रोटरी मिडटाऊन', 'भागीरथी' आणि 'वस्त्रम्'चा आदर्श उपक्रम; शिलाई प्रशिक्षणातून महिला होताहेत उद्योजिकाप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहातशिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात राधानगरी धरण 99.14 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी धरणांची वाटचाल पूर्णत्वाकडे; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीडी. वाय. पाटील व तंत्र विद्यापीठाला ‘बेस्ट युनिव्हर्सिटी’ पुरस्कार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते सन्मान दानोळीत शादीखाना हॉलसाठी २५ लाखांचा निधी; आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाईकोल्हापूर सर्किट बेंच अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त 'पदवीधर मित्र'च्यावतीने शहरात साखर वाटपवातानुकुलित, पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

दानोळीत शादीखाना हॉलसाठी २५ लाखांचा निधी; आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाई

schedule01 Aug 26 person by visibility 178 categoryराज्य

दानोळी : दानोळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देणारे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या शादीखाना हॉलसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या हॉलचा पाया खुदाई शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार डॉ. यड्रावकर यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला प्राधान्य देणे हीच आपली भूमिका असल्याचे सांगितले. दानोळी गावाच्या विकासासाठी आजपर्यंत सुमारे १२ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृहे आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. मुस्लिम समाजासाठी उभारण्यात येणारा शादीखाना हॉल हा सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुस्लिम समाजाच्या वतीनेही आमदार डॉ. यड्रावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.  या हॉलमुळे विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला. 

या  कार्यक्रमास पै.केशव राऊत, महादेव धनवडे, बादशहा जमादार, बापूसाहेब दळवी, गुंडू दळवी, धन्यकुमार पाराज, परशुराम सावंत, पिंटू पाराज, अमिर घुणके, असिफ तांबोळी, विकास वाळकुंजे, उदय राऊत, पै. सुकुमार सकाप्पा, जे. एन. पाटील, सतिश मलमे, सोमा माने, प्रकाश माने, संजय परमाप्पा, बबन भोसले, शाकीर तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes