SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मानशासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर​'रोटरी मिडटाऊन', 'भागीरथी' आणि 'वस्त्रम्'चा आदर्श उपक्रम; शिलाई प्रशिक्षणातून महिला होताहेत उद्योजिकाप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहातशिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात राधानगरी धरण 99.14 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी धरणांची वाटचाल पूर्णत्वाकडे; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीडी. वाय. पाटील व तंत्र विद्यापीठाला ‘बेस्ट युनिव्हर्सिटी’ पुरस्कार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते सन्मान दानोळीत शादीखाना हॉलसाठी २५ लाखांचा निधी; आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाईकोल्हापूर सर्किट बेंच अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त 'पदवीधर मित्र'च्यावतीने शहरात साखर वाटपवातानुकुलित, पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

राधानगरी धरण 99.14 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी धरणांची वाटचाल पूर्णत्वाकडे; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली

schedule01 Aug 26 person by visibility 145 categoryसामाजिक

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.29 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र.3 व 6 हे खुले असून सध्या धरणातून स्वयंचलित व्दारामधून 2856 व पावर हाऊसमधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे हे 100% भरण्याच्या मार्गावर आहेत .

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ व कळे,  दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची व दानोळी, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी,  तुळशी नदीवरील- कसबा बीड व ताम्रपर्णी नदीवरील चंदगड व कुर्तनवाडी असे एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.29 (99.14 टक्के), तुळशी 3.01 (86.68 टक्के), वारणा 29.76 (86.52 टक्के), दूधगंगा 17.26 (67.99 टक्के), कासारी 2.35 (84.60 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.19 (80.74 टक्के), पाटगाव 2.67 (71.78 टक्के), चिकोत्रा 0.88 (58 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.17 (93.99 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (100 टक्के) व कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 31.11, सुर्वे 30.05, रुई 60.06, इचलकरंजी 57.03, तेरवाड 51.11, शिरोळ 47.10, नृसिंहवाडी 45.09 .फूट इतकी पाणीपातळी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes