गुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश सुरु
schedule21 May 25 person by visibility 115 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक कोल्हापूर या वसतीगृहामार्फत समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत वसतीगृह प्रवेश देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष सन 2025- 26 मध्ये 10 वी उत्तीर्ण व इयत्ता 11 वी मध्ये कोल्हापूर शहर व परिसरामधील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करावा, असे आवाहन गृहपाल एम.एन.जगताप यांनी केले.
अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास, इतर मागास व आर्थिक दृष्ट्या मागास, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सोईसुविधा पुरविण्यात येतात. प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्रमांक 0231- 2547264 व मो. 8308379099 वर संपर्क साधावा.
▪️पाचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरु
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत पाचगाव, कोल्हापूर येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पाचगाव येथे शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक कोल्हापूर शहर व परिसरामधील विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह पाचगाव, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक किरण पाटील यांनी केले आहे.
वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ, इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9764745072 व 9503376533 वर संपर्क साधावा, असेही श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.