कोल्हापुरात आरोग्य विभागाच्या 100 कर्मचा-यांमार्फत क्रॉसड्रेनची व साचलेल्या ठिकाणाची सफाई
schedule21 May 25 person by visibility 268 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : आरोग्य विभागामार्फत शहरात अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे मुख्य चौकातील गटारी व क्रॉसड्रेन चोकअप होऊन वहात होते. या सर्व गटारी व क्रॉसड्रेनची आरोग्याच्या 100 कर्मचा-यांमार्फत काल दुपारपासून रात्री उशीरापर्यंत स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, राजारामपुरी, सीपीआर चौक, स्टॅन्ड परिसर या ठिकाणी क्रॉसड्रेनमध्ये कचरा, प्लॅस्टीक, कपडे, मच्छरदाणी अशा प्रकारचा कचरा अडकल्याने हे ठिकाण चोकअप झाले होते. हा सर्व कचरा महापालिकेच्या कर्मचा-यांच्या सहाय्याने काढून नाले व चौक सफाई करण्यात आले.
तसेच लहान व मोठया नाल्यांची सफाई चांगल्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे जयंती नाला व गोमती नाल्यांचे पाणी वाहते राहीले. शहरात काल दिवसभरात वादळीवारे आणि पावसामुळे पडली झाडे झाडे बाजूला करुन रस्ता मोकळा करण्यात आला. रेल्वे स्टेशन ते व्हीनस कॉर्नर या ठिकाणी ड्रेनेज लाईन मोठ्या प्रमाणात चोकअप झाली होती ते चोकअप काढण्यात आले. यासाठी 13 आरोग्य निरिक्षकांमार्फत 100 सफाई कर्मचा-यांनी ही सफाई केली. तर 3 जेट मशीनद्वारे ड्रेनेज लाईन साफ करण्यात आली.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक बॉटल अथवा इतर टाकाऊ पदार्थ नाल्यामध्ये, चॅनलमध्ये टाकू नये असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.