SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कसबा बोरगाव येथे पोहताना धरण परिसरामध्ये तरुण बुडाला; १० तास उलटूनही शोध नाहीकागलमध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळकागलच्या पाझर तलावातील जलतरण स्पर्धेत २०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभागमहायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर मंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापुरात ध्वनिप्रदूषणाचा महास्पोट; अनंत चतुर्दशी विसर्जनाने बसवल्या कानठळ्या, महाद्वार रोड आणि पापाची तिकटी ठरले सर्वाधिक कर्णकर्कश!शिवाजी विद्यापीठात ३० सप्टेंबरला ‘व्हॉइस ॲक्टिंग’ कार्यशाळाकोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढकोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सवशिरोळ तालुक्याला दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार यड्रावकर

जाहिरात

 

शिरोळ तालुक्याला दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार यड्रावकर

schedule27 Sep 26 person by visibility 214 categoryराज्य

◼️शिरोळ तालुका विकास सेवा संस्थांची आढावा बैठक संपन्न

जयसिंगपूर : पावसाचे प्रमाण यंदा कमी झाल्याने शिरोळ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्याचा दुष्काळी परिस्थितीत समावेश व्हावा यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असून, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ शक्य आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकरी, विकास सेवा सोसायट्या, शैक्षणिक संस्था, ऊसतोडणी यंत्रणा तसेच विविध उद्योगांना अर्थसहाय्य देण्याचे धोरण सुरू आहे. बँकेचा कारभार शेतकऱ्यांच्या विश्वासावर सुरू असून, ज्या शाखेत गैरव्यवहार आढळेल तेथे संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला. 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांना व्हावी, कोल्हापूर जिल्हा बँक सभापूर्व आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर सेवा संस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शिरोळ तालुका विकास सेवा संस्थांची आढावा बैठक जिल्हा बँकेचे संचालक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी सुरेश शाहापुरे यांनी स्वागत केले. प्रास्तविक प्रभाकर मोरे यांनी केले.

 यावेळी विविध सेवा संस्थेचे सचिव, चेअरमन व संचालक यांनी आपले प्रश्न उपस्थित केले. यावेळी सेवा सोसायट्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांचे आभार मानले. रिबिट योजना ही सेवा संस्थांना संजीवनी देणारी योजना असून ही योजना अशीच सुरू ठेवावी अशी मागणी केली. 

कर्ज वाटपामध्ये कार्यक्षेत्राची अट, रोकड स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून मिळीवी, शेतकऱ्यांची कर्ज मर्यादा वाढविण्याची मागणी करण्यात आली. नविन सचिव भरती करण्यासाठी प्रयत्न करावेत. खावटी, आकस्मिक कर्ज कमी करून पीक कर्ज वाढवावेत. कर्ज माफीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे यासह विथ प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न जिल्हा बँकेच्या सभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. 
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा सहकाराचा अग्रणी समजला जातो. राज्याने, देशानेच नव्हे तर जगाने आदर्श घ्यावा अशा पध्दतीने सहकार चालविण्याची परंपरा या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. जिल्हा बँक ही येथील शेतकऱ्यांची मुख्य अर्थवाहिनी आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठीच जिल्हा बँकेची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा चेहरा-मोहरा बदलायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा बँक पोहोचली पाहिजे. शिरोळ तालुका विकास सेवा सोसायटी भवन बांधकामाची सुरुवात करून भव्य इमारत लवकरच साकारण्यात येणार आहे. जिल्हयात ८० प्रिंटर मशीन बसविण्यात येत आहे' अर्ज करणाऱ्या संस्थांना मायक्रो एटीएम देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज प्रामुख्याने शेतकरी, साखर कारखाने आणि ठराविक संस्थांपुरते मर्यादित होते. मात्र, आता ग्रामीण भागातील विविध घटकांना बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षक, घरबांधणी, शैक्षणिक संस्था, विविध महामंडळांच्या योजना, ऊसतोडणी यंत्रे, वाहतूकदार तसेच सोलर प्रकल्पांसाठीही कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

विकास सेवा सोसायट्या या गावाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे माध्यम असून, त्यांनी केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता विविध व्यवसाय व उपक्रमांना चालना द्यावी. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यासाठी बँक व शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य केले जाईल.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शिरोळ तालुक्याचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवीदारांच्या पैशाला पूर्ण संरक्षण देणे ही संचालक व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही शाखेत गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. कर्जप्रकरणे वेळेत मंजूर करून शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

या प्रसंगी संजय पाटील यड्रावकर,  सहायक निबंधक संदीप शिंदे, व्यवस्थापक गिरीष पाटील, रणजित कदम, रणजित पाटील, शाबगोंडा पाटील, महादेव धनवडे, रमेश भुजूगडे, रामचंद्र मोहिते, विशाल आवटी, चंद्रकांत जोंग, मल्लाप्पा चौगुले, उपनगराध्यक्ष दिपक गायकवाड, दिलीप पाटील, विशाल आवटी, जयपाल कुंभोजे यांच्या शिरोळ तालुक्यातील विविध संस्थांचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes