SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कसबा बोरगाव येथे पोहताना धरण परिसरामध्ये तरुण बुडाला; १० तास उलटूनही शोध नाहीकागलमध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळकागलच्या पाझर तलावातील जलतरण स्पर्धेत २०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभागमहायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर मंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापुरात ध्वनिप्रदूषणाचा महास्पोट; अनंत चतुर्दशी विसर्जनाने बसवल्या कानठळ्या, महाद्वार रोड आणि पापाची तिकटी ठरले सर्वाधिक कर्णकर्कश!शिवाजी विद्यापीठात ३० सप्टेंबरला ‘व्हॉइस ॲक्टिंग’ कार्यशाळाकोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढकोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सवशिरोळ तालुक्याला दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार यड्रावकर

जाहिरात

 

कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव

schedule27 Sep 26 person by visibility 138 categoryसामाजिक

◼️२९ व ३० सप्टेंबर रोजी मराठी चित्रपटगीतांची सुरेल मैफल; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य 

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि अविस्मरणीय चित्रपटगीतांचा रसिकांना अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर आणि बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज परिसर, राजारामपुरी, कोल्हापूर येथे हा महोत्सव होणार आहे.

दोन दिवसांच्या या महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कालखंडातील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली भावविश्वे, संगीतपरंपरा आणि गीत-संगीताचा समृद्ध वारसा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपटसंगीताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी गीते, त्यातील भावस्पर्शी आशय आणि संगीताची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटगीतांच्या समृद्ध वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम  सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच विविध कलाप्रकार आणि संगीतपरंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या महोत्सवातील दोन्ही दिवसांचे कार्यक्रम प्रवेश विनामूल्य असून कोल्हापूर व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘मराठी चित्रपटगीत महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes