उपसंचालक प्रवीण टाके यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली
schedule01 Aug 26 person by visibility 265 categoryसामाजिक
कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोल्हापूर येथील उपसंचालक प्रवीण टाके यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाल्याने विभागीय माहिती कार्यालयात त्यांना निरोप देण्यात आला.
श्री टाके यांची छत्रपती संभाजीनगर येथे तर जिल्हा माहिती अधिकारी (कोल्हापूर) सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली. त्यांच्या ठिकाणी सातारा येथील जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडेच उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
सिंधुदुर्ग येथील जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली झाली टाके व अडसूळ यांना नुकताच विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर,माहिती अधिकारी फारूक बागवान , सहायक संचालक वृषाली पाटील,पत्रकरिता विभाग प्रमुख प्रा.निशा मुढे, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह माध्यम क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.येत्या सोमवारी हे सर्व अधिकारी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत.