डीकेटीईमध्ये गेली चार दशके निरंतर टेक्स्टाईल विभागातील १०० टक्के आणि दर्जेदार प्लेसमेंटची परंपरा कायम
schedule04 Aug 25 person by visibility 230 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील बी.टेक. टेक्स्टाईल्समधील गेल्या चार दशकांपासून १०० टक्के प्लेसमेंटची उज्वल परंपरा कायम राखत याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले आहे. विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यामध्ये उत्तम पॅकेजवरती झाली आहे. या यशामागे संस्थेचे उदयोगाभिमुख अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा कौशल्यावर दिलेला भर आणि इंडस्ट्री ट्रेनिंग यांचे मोलाचे योगदान आहे.
डीकेटीई टेक्स्टाईलसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये सुमारे ५० हून अधिक कंपन्या कॅम्पस इंटरव्हयूसाठी भेट दिली व एकूण २३८ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयूव मधून निवड केली. प्लेसमेंट मिळणा-या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणा-या या कंपन्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्लासीक फॅशन जॉर्डन, स्टँडर्ड कारपेट दुबई, इपिक ग्रुप हॉंगकॉंग, तसेच राष्ट्रीय रीलायन्स, रेमण्डस, ट्रायडेंट, अरविंद, वर्धमान, डायस्टर, अदित्यबिर्ला, शाही एक्स्पोर्टस, वेलस्पन, अलोक, मधुरा कोट, लगुना क्लोदींग, इंडोकॉउंट, कॉटनकिंग, हिंमतसिंगका, जॉकी अशा आघाडीवरच्या वस्त्रोद्योग कंपन्यांचा समावेश आहे. ही अभूतपूर्व कामगिरी म्हणजेच डीकेटीईच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उदयोग जगतामधील विश्वासार्हतेची साक्ष आहे.
क्लासिक फॅशन ऍपेरिएल इंडस्ट्री लि. जॉर्डन या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ८ विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड झालेली आहे. या वर्षी ट्रायडेन्ट या कंपनीमध्ये २ विद्यार्थ्यांची १२ लाख पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डीकेटीईतील टेक्स्टाईल चे सुमारे ६०० विद्यार्थी दरवर्षी सुटटी च्या काळात महिना भरासाठी देशविदेशात प्रशिक्षणासाठी जातात. कांही विद्यार्थ्यांना यासाठी स्टायपंड देखील मिळते. या वर्षी एकूण ५४ विद्यार्थ्यांची प्री प्लेसमेंट द्वारे निवड झाली आहे. ३०० हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्याबरोबर नेटवर्क असल्यामुळे हे शक्य होत आहे.
इंजिनिअरींग कॉलेजीस ची गुणवत्ता याचा विचार करता कुठे प्रवेेश घ्यावा या विषयी विद्यार्थी वर्गात आणि पालकांच्यात प्रचंड गोंधळ उडालेला असतो. प्रत्येकजण विविध सल्ले देतच असतात पण निर्णय मात्र होत नाही. या सर्व बाबतीत मग त्या त्या कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्ड हे अतिशय महत्वाचे ठरु लागते. गेल्या चाळीस वर्षाचे रेकॉर्ड पाहिले गेेले तर डीकेटीई टेक्स्टाईल विभागाची प्लेसमेंट निरंतर १०० टक्के होत आहे हे उल्लेखनिय असेच आहे. डीकेटीईच्या प्राध्यापकांची अनुभवसंपन्नता, अद्ययावत मशीनरी, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय, इंडस्ट्री इन्स्टियूट इंटरऍकशन यांचे योगावर विद्यार्थी संख्या वाढत असूनही १०० टक्के प्लेसमेंटस सुरु आहे.
सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त, संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. अडमुठे,उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, टीपीओ प्रा.एस.बी. अकिवाटे याचे मार्गदर्शन लाभले आहे.