नांदणी दगडफेक प्रकरणातील ३२ जणांना जामीन मंजूर
schedule04 Aug 25 person by visibility 238 categoryराज्य

कोल्हापूर : माधुरी हत्तीला वनताराला घेऊन जात असताना जमावाने पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती. या घटनेत १४ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. तसेच ७ शासकीय वाहनांचे नुकसान झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात ओळख पटलेल्या ३९ जणांसह अज्ञात १२५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या ३९ पैकी ३२ जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे.नांदणी येथील ऐतिहासिक जैन मठातील माधुरी हत्तीला वनतारा प्रकल्पात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता.
गावकऱ्यांनी 'आमची माधुरी आम्हाला परत द्या' अशी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून या निर्णयाचा निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.