SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'केडीएल प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून थरार; ५०० खेळाडूंचा सहभागइचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३४ जणांना अटक, पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्तबारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड; लक्ष्मण हाके यांची माघारक्रीडाशक्तीतून शांतता आणि प्रगतीकडे: 'आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस'बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानातविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभाबळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्रीभोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशयसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जाहिरात

 

बारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड; लक्ष्मण हाके यांची माघार

schedule06 Apr 26 person by visibility 109 categoryराजकीय

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून ओबीसी हक्क आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बारामतीमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली  आहे.

लक्ष्मण हाके यांनी आपली उमेदवारी मागे घेताना प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या हिताचा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केल्याचे समजते. "ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम राहून आणि समाजाची मते विभागली जाऊ नयेत, या उद्देशाने आपण हा निर्णय घेत आहोत," असे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आले होते तसेच त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री, आदी मान्यवरांनी उमेदवारी माघार घेण्याविषयी आवाहन केल्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेत आहोत असे हाके यांनी सांगितले. मात्र समाजासाठी  लढा यापुढे सुरूच राहील असे त्यांनी नमूद केले.

हाके यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक तिरंगी किंवा अधिक चुरशीची होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता प्रस्थापित उमेदवारांमधील लढत थेट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
या माघारीनंतर बारामतीमधील निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून, राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लक्ष्मण हाके आता कोणाला पाठिंबा देतात की तटस्थ राहतात, याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes