SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित; डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदाननुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सज्जतेचा आढावाइचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाईपोटी पाच वर्षांत अनुक्रमे ६५७ कोटी, ३९२ कोटी मिळणारसंभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक : पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजनमदर्स डे निमित्त आयोजित स्पर्धेत अजिंक्य विजयकुमार खराडे विजेताकराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा : पालकमंत्री शंभूराज देसाई डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटींग मार्गदर्शन शिबिर संपन्न ... या प्रकरणी बाहेरील संस्थेकडून अथवा व्यक्तींकडून फसवणूक झाल्यास कोल्हापूर महानगरपालिका जबाबदार नाही‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत’ पुरस्काराचे वितरण; वर्षा निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने पुरस्कार स्वीकारलामसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित; ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लाभला पुरस्कार

जाहिरात

 

पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक आयोगाचा निर्णय

schedule25 May 25 person by visibility 307 categoryदेश

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या आहेत.

गुजरात : (१) कडी (अनुसूचित जाती):  कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे (२) विसावदर:  भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे; केरळ : (३) निलांबूर:  पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे; पंजाब: (४) लुधियाना वेस्ट:  गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे आणि पश्चिम बंगाल: (५) कालिगंज:  नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे.

▪️निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :
अधिसूचना जारी होण्याची तारीख २६ मे २०२५; नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५; नामनिर्देशन छाननी ३ जून २०२५; उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५; मतदान १९ जून २०२५ आणि मतमोजणी २३ जून २०२५ रोजी होऊन निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे.

सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी १२ पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes