SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल"जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापूर महानगरपालिका : लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार १३ वारसांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्रेस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त ८ रोड स्विपिंग मशिन्सचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पणदुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी रंगणार 'शिवराज्याभिषेक सोहळा': ऐतिहासिक स्मृतींना उजाळाकोल्हापुरात 'महाराष्ट्रधर्म' शिबिराचे आयोजन: पुरोगामी विचारांच्या संवर्धनासाठी जनजागरणाची हाकप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी मेधावी ठरली राज्यस्तरीय इंग्रजी वाचक स्पर्धेत अव्वल32 गरजू बाल हृदय रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणारजागतिक पालक दिन: निस्वार्थी प्रेमाचा आणि बलिदानाचा सन्मानजागतिक दूध दिन: आरोग्याचा आणि समृद्धीचा एक गोड सोहळा

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार १३ वारसांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे

schedule01 Jun 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील झाडू/सफाई कामगार पदावरील दिवंगत, वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. हा कार्यक्रम सासने मैदान येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, महापौर सौ.रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

या नियुक्ती आदेशास महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभागातील रिक्त पदांवर ही नियुक्ती करण्यात आली असून नियुक्त उमेदवारांना झाडू कामगार व सफाई कामगार पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. या उमेदवारांची सेवा ही आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहणार असून त्यांना एक वर्षाचा परिविक्षा कालावधी लागू राहणार आहे. या नियुक्तीमुळे महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेलाही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. 

यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभपती विशाल शिराळे, महिला व बाल कल्याण सभापती  कौसर बागवान, उप-सभापती दिपा ठाणेकर,  मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेता शारंगधर देशमुख, आदिल फरास, नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम, संजय मोहिते, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका अर्चना पागर, राजनंदा महाडीक, प्राजक्ता जाधव, स्वाती कांबळे, सृष्टी जाधव, मंगला साळोखे, वंदना मोहिते, दिपाली घाटगे, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, उप-आयुक्त परितोष कंकाळ, माजी महापौर सुनल कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes