शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
schedule25 May 25 person by visibility 217 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थानाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने नियोजन दिनांक 27 मे ते दिनांक 30 मे 2025 व दिनांक 2 जून ते दिनांक 5 जून 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे.
त्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
अशी माहिती पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.