शिवाजी विद्यापीठातील ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या ३० मार्च पर्यंत मुदत
schedule23 Mar 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग व ए.आय.सी.टी.ई.मान्यता प्राप्त ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील जानेवारी-फेब्रुवारी २०२६ सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दि.३०/०३/२०२६ पर्यत सादर करावेत.अशी माहिती संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी दिली.
विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या वतीने ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रम गेल्या वर्षा पासून सुरु आहे. हा अभ्यासक्रम प्रवेश, अध्ययन, परीक्षा व निकाला पर्यंत असणारी सर्व शैक्षणिक प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरुपाची असणार आहे. ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची पदवी ही इतर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या समकक्ष आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकष एकचा दर्जा असणारे शिवाजी विद्यापीठ ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करून बदलत्या जगातील आव्हानांना विद्यार्थी समर्थपणे समोर जावा याकरिता एक ऐतिहासिक पाऊल टाकत आहे.आता घर बसल्या मोबाईल,संगणक च्या द्वारे जागतिक दर्जाचा ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र इच्छुकांना देत आहे.
सुसज्ज अशा लर्निंग मेनेजमेंट सिस्टीम द्वारे विषय तज्ञांनी विकसित व्हिडीओ लेक्चर्स, इ –बुक्स लाईव्ह कॉन्सालिंगसेशन,डिस्कशन फोरम ,प्रक्टीस टेस्ट च्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी प्रवेश अर्ज विद्यापीठ संकेतस्थळ यावर करणे आवश्यक आहे. तरी या लिंकला https://online.unishivaji.ac.in/admissions/ जावून प्रवेश अर्ज दि.३० मार्च २०२६ पर्यंत भरावा असे आवाहन संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी केले आहे.


