SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोलीस प्रशासनाचा 'खाक्या'! हुपरीतील "एस. एम. बॉईज गॅग" टोळीवर हद्दपारीचे अस्त्र; एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्हाबंदीशिवाजी विद्यापीठातील ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या ३० मार्च पर्यंत मुदत डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करारशिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादनअवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई होणार कोल्हापूर महापालिकेच्यावतीने भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुरुमहाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरासीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादकागल बुद्धिबळ स्पर्धेत ओजस व्हनमाने अजिंक्य, श्रवण ठोंबरे उपविजेताकोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाचा सन 2026-2027 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर

जाहिरात

 

डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

schedule23 Mar 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  डीकेटीईचे टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटयूट (व्हीजेटीआय), मुंबई यांच्यात शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्याला नवी उंची देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही संस्थामध्ये ज्ञानविनिमय, संशोधन सहकार्य आणि प्रगत प्रशिक्षण उपक्रमांना गती मिळणार असून विद्यार्थ्याना जागतिक दर्जाचे, उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. सैध्दांतिक शिक्षणासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव देण्यासाठी इंटर्नशिप, इंडस्ट्रीयल व्हिजीटस व विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. क्रेडिट ट्रान्सफरची अभिनव सुविधा या कराराचे प्रमुख वैशिष्टय ठरणार असून, विद्यार्थ्यांना अधिक लवचिक, बहुआयामी आणि समृध्द शैक्षणिक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास,संशोधनाची गती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता यामध्ये लक्षणीय वाढ व्हावी हा या करारामागचा उददेश आहे. प्रशिक्षीत व सक्षम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण प्लेसमेंटसाठीही दोन्ही संस्था संयुक्तरीत्या कार्य करणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षक करिअर संधीचे दरवाजे खुले होणार आहेत. एकंदरीत हा करार शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक बळकट करत तांत्रिक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टता नवोपक्रम आणि गुणवत्ता यांना नवी चालना देणारा ठरणार आहे. डीकेटीईने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अग्रगण्य संस्थाशी करार केले असून, महाराष्ट्रातील नामवंत संस्थेशी झालेला हा करार संस्थेच्या शैक्षणिक उंचीचा पुढचा टप्पा आहे.

यासोबतच, उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमाचे सातत्याने अद्ययावतीकरण, फॅकल्टी डेव्हलपमेंट पोग्रॅम, क्षमता विकास उपक्रम आणि तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय संयुक्तपणे पेटेन्ट तयार करणे,संशोधनलेख आंतरराष्ट्ीय जर्नलस्मध्ये प्रसिध्द करणे,विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करणे,रिसर्च यासह संयुक्तरीत्या अनेक उपक्रम राबविले जाण्यासंबंधी करारात समावेश आहे.
डीकेटीईच्या शिष्टमंडळानी व्हीजेटीआय मुंबई येथे भेट दिली. आयोजित कार्यक्रमात व्हीजेटीआयचे डायरेक्टर प्रा. डॉ सचिन कोरे, डे.डायरेक्टर डॉ आर.एन. आवळे, असोसिएट डीन वाय.एम.काळे आणि डीकेटीईच्या डायरेक्टर डॉ एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, प्रा.डॉ.एस.के.शिरगांवे, डॉ. आर.एन.पाटील, डॉ.व्ही.डी. शिंदे यामध्ये चर्चा झाली.त्यानंतर डीकेटीई आणि व्हीजेटीआय यांच्यामध्ये विद्यार्थी कल्याणासाठी एकत्र येण्याचा तसेच एकमेकांना सहकार्य करण्याबाबत कराराचे आदानप्रदान झाले. 

यावेळी व्हीजेटीआयचे डायरेक्टर डॉ सचिन कोरे यांनी डीकेटीईचे कार्य याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे करारासाठी मार्गर्शन मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes