SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सांगरुळ येथील सराफ लूटप्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्तस्वच्छता मोहिमेत 8 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठावविद्यार्थ्यांनी संशोधनातून कृषी क्षेत्राला नवी दिशा द्यावी : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे​"मारो फिरंगी को!" – १८५७ च्या क्रांतीचा पहिला हुंकार देणारे 'आद्य क्रांतिकारक' मंगल पांडे यांना विनम्र अभिवादन! पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मुस्लिम ओबीसी आरक्षणाचे जनक हाजी शब्बीर अन्सारी यांना कोल्हापुरात भावपूर्ण श्रद्धांजली"उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढकोल्हापुरात ११ एप्रिलपासून 'भीम फेस्टिव्हल'चा जागर; डिगे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान

जाहिरात

 

स्वच्छता मोहिमेत 8 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव

schedule29 Mar 26 person by visibility 99 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी आज स्वच्छता मोहिम अभियान राबविण्यात आली. हि स्वच्छता मोहिम महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 8 टण कचरा प्लॅस्टिक, तणकट, खरमाती व इतर कचरा गोळा करण्यात आला.

  महापौर सौ रूपाराणी निकम यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता मोहीम घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

  अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे यांच्या नियंत्रणाखाली हि स्वच्छता मोहीम पार पडली. सकाळी 7 वाजलेपासून शहरातील सायबर चौक, आयएस ट्रेनिंग सेंटर, टाकाळा चौक ते शेंडा पार्क रोड, हॉकी स्टेडिअम चौक, व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, माऊली पुतळा, रेड्याची टक्कर चौक, खानविलक पेट्रोप पंप ते धैर्यप्रसाद चौक, व्हिनस कॉर्नर ते सीबीएस स्टँण्ड व पंचगंगा नदी घाट या परिसरात मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.

  या स्वच्छता मोहिमेत मुख्य रस्ते, फूटपाथ वरील तनकट, खरमाती, प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेतून 20 ट्रॅक्टर व 4 डंपर कचरा, खरमाती, प्लॅस्टिक व तनकट गोळा करण्यात आला.

  या स्वच्छता मोहिमेत महापालिकेच्या स्थानिक संस्था कर, ब्युरो, जन्म मृत्यू विभाग, सामान्य प्रशासन, आस्थापना, परवाना, विद्युत, कार्यशाळा, घरफाळा, नगररचना, जनसंपर्क, नगरसचिव कार्यालय, वर्कशॉप, आरोग्य प्रशासन, मुख्य लेखापाल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता केली.

  या मोहिमेत सभागृहनेता मुरलीधर जाधव, उपशहर अभियंता अरुण गुजर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सर्व आरोग्य निरिक्षक महापालिका आरोग्य विभागाचे 500 व विविध विभागाकडील 250 कर्मचारी व नागरीकांनी सहभाग घेतला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes