अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.) चा दहावीचा निकाल ९६ टक्के; सफीया नदाफ प्रथम
schedule09 May 26 person by visibility 116 categoryसामाजिक
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लीम बोर्डिंग), कोल्हापूर संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.) या शाळेचा फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. (दहावी) परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. ग्रामीण भागातील या शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेमध्ये सफीया अल्लाउद्दीन नदाफ हिने ९१.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. हुमेरा बशीर जालगिरी हिने ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर सतीजा समीर पटेल हिने ८०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती चेअरमन मलिक बागवान, संचालक रफीक शेख, जहाँगीर अत्तार, हाजी पापाभाई बागवान, हाजी लियाकत मुजावर, आल्ताफ झांजी, रफीक मुल्ला आणि फारुक पटवेगार यांनी अभिनंदन केले आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम. एम. तहसीलदार, वर्ग शिक्षक नगरदी सर, शिक्षिका जमादार मॅडम, पटवेकर सर आणि पटेल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.