SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथळी, दानोळीत आरोग्य शिबिरआरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभागज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "जलद चालण्याची स्पर्धा" उत्साहातपरदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना मिळाले बळयड्राव बँकेला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदानकोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभआचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा

जाहिरात

 

उत्तम आवाजासाठी योग, प्राणायाम आवश्यक : दैनी

schedule01 Oct 26 person by visibility 201 categoryशैक्षणिक

मास कम्युनिकेशन विभागात व्हाईस अ‍ॅक्टींग कार्यशाळा
कोल्हापूर : आवाजाची सुरुवात श्वसनापासून होत असते. आवाज हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असून त्याचा पोत उत्तम असायला हवा. यासाठी नियमित योग आणि प्राणायाम आवश्यक असल्याचे मत व्हॉईस आर्टिस्ट, लेखक भरत दैनी यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि विंडो फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने मास कम्युनिकेशन विभागात व्हॉईस ॲक्टिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

दैनी म्हणाले, आवाज हे फक्त संभाषणाचे माध्यम नाही, तर तो विचार, भावना आणि अनुभव व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे. आवाजावर प्रभुत्व मिळवण्यासाठी योग व प्राणायाम महत्त्वाचे असून नियमित सराव आवश्यक आहे. या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत; तरच या क्षेत्रात टिकून राहता येईल.
प्रत्येक आवाजाची काही भाषिक वैशिष्ट्ये असतात. ती समजून घेणे आवश्यक असून आवाजामध्ये भावनिक प्रामाणिकपणा असणे महत्त्वाचे आहे,असेही दैनी यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विलास शिंदे म्हणाले की, आवाजात टोन हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक ठिकाणी आवाजाचे वेगळे महत्त्व आहे, ते आपण जाणून घेतले पाहिजे. कोणती माहिती शांतपणे आणि कोणती माहिती आक्रमकपणे द्यायला हवी याची जाण असणं आवश्यक आहे आणि यासाठी आवाज खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

यावेळी विंडो फिल्म प्रोडक्शनचे संचालक चंद्रशेखर गुरव, चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया, हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, दादू संकपाळ, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर, विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख अभिनव गुरव व खुशिया त्र्यंबके यांनी करून दिली. सूत्रसंचालन सायली गणेशकर यांनी केले, तर आभार रितेश कोलभ यांनी मानले.

▪️स्टुडिओत आवाजाचे प्रॅक्टिकल!
व्हॉईस आर्टिस्ट, अभिनेते व लेखक भरत दैनी यांनी विद्यापीठाच्या रेडिओ स्टुडिओमध्ये  विद्यार्थ्यांसह उपस्थितांना आवाजाच्या विविध पैलूंचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. आवाज रेकॉर्ड करून त्यातील बारकावे त्यांनी समजावून दिले. माइक समोर बोलताना आवाजाच्या संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे, याचा डेमो त्यांनी करून दाखवला. 

फोटो : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये आयोजित व्हॉइस एक्टिंग कार्यशाळेत बोलताना भरत दैनी.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes