स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथळी, दानोळीत आरोग्य शिबिर
schedule01 Oct 26 person by visibility 168 categoryआरोग्य
◼️१ हजार २३ नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
कोथळी : सहकार महर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळी व दानोळी येथे मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये एकूण १ हजार २३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. कवठेसार, कोथळी आणि दानोळी या गावातील झालेल्या आरोग्य शिबिरात आज अखेर १ हजार ४६१ मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली आहे.
कोथळी येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील यांच्या हस्ते, तर दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन क्रांती पतसंस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री कलेश्वर हॉलमध्ये आयोजित शिबिरात २३३ नागरिकांची नेत्र तपासणी, तर १७० नागरिकांची फिजिकल आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच प्राथमिक शाळेत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे कोथळी येथे एकूण ५०३ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी गरजू रुग्णांना मोतीबिंदू तपासणी तसेच चष्म्यांचे देखील वाटप करण्यात आले.
यावेळी शिरोळ तालुका सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे, यड्राव बँकेचे व्हा. चेअरमन दिलीप मगदूम, राजेंद्र नांदणे, सागर बोरगावे, आण्णासो चौगुले, सुकुमार खवाटे, आण्णासो आंबी, सुरगोंडा हौजे, पै. रवी पुजारी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, दानोळी येथे झालेल्या आरोग्य शिबिरात १६० नागरिकांची आरोग्य तपासणी, तर ३६० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण ५२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी महादेव धनवडे, पै. केशव राऊत, बाबुसाहेब दळवी, गुंडू दळवी, डी. ए. पाटील, धन्यकुमार पाराज, परशराम सावंत, विकास वाळकुंजे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.