SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथळी, दानोळीत आरोग्य शिबिरआरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभागज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "जलद चालण्याची स्पर्धा" उत्साहातपरदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना मिळाले बळयड्राव बँकेला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदानकोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभआचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा

जाहिरात

 

आचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित

schedule01 Oct 26 person by visibility 131 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी (शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी) लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर  रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येतो.

मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 03 पदवीधर व 02 शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक -2026 अनुषंगाने शहरात मंगळवार, दि.22 सप्टेंबर 2026 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार आयोजित करण्यात येणार नाही. याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes