कोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई
schedule01 Oct 26 person by visibility 281 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक, विभागीय कार्यालय क्र. १ (गांधी मैदान) तसेच इस्टेट व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने कळंबा साई मंदिर परिसरातील महापालिकेच्या रिकाम्या जागेत उभारण्यात आलेल्या २५ हातगाड्यांवर आज कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले.
महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही हातगाडीधारक व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून आपले साहित्य हटविले. मात्र, महापालिकेकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांचे अनधिकृत साहित्यही जप्त करण्यात आले. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने व उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये सहायक आयुक्त उज्वला शिंदे, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक रवी कांबळे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक, उपद्रव शोध पथक, इस्टेट विभाग व विभागीय कार्यालय क्र. १ मधील कर्मचारी सहभागी झाले होते.