SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ ची काटेकोर अंमलबजावणी करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्देशतर्कसंगत विचारांना एआय पर्याय असू शकत नाही राजश्री मोरे : माध्यम संशोधन विषयावर विद्यापीठात कार्यशाळाडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेपकेन चेस अकॅडमीचा डबल धमाका! हर्ष व नारायणी यांना आंतरराष्ट्रीय जलद रेटिंगशिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढबोगस दस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळमध्ये विजय महायुतीचाच होणार, पण इतका त्रास का झाला? मंत्री हसन मुश्रीफ यांचा थेट सवाल!माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुखकोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेश

जाहिरात

 

तर्कसंगत विचारांना एआय पर्याय असू शकत नाही राजश्री मोरे : माध्यम संशोधन विषयावर विद्यापीठात कार्यशाळा

schedule05 Sep 26 person by visibility 161 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : एआयमुळे माध्यम संशोधनास मदत होत आहे. अनेक गुंतागुंतीच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी एआय संशोधकांना सहायभूत ठरत आहे. तथापि, ते मानवी मेंदूला आणि तर्कसंगत विचारांसाठी पर्याय असू शकत नाही, असे मत संगणकशास्त्र अभ्यासक राजश्री मोरे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात पीएम उषा अंतर्गत आयोजित माध्यम संशोधन विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते. 

विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा झाली. यावेळी ग्रंथालय शास्त्रातील संशोधक अतुल नगरकर व्यासपीठावर उपस्थित होते.


मोरे म्हणाल्या, एआयमुळे माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करणे सोपे झाले आहे. पण या माहितीवर सरसकट विश्वास ठेवणे घातक आहे. माहितीची खातरजमा करणे सर्वात मोठे आव्हान आहे. एआयमुळे संशोधनाचे काम सोपे होत असले तरी त्यातून संशोधकांची विश्लेषण आणि चिकित्सक दृष्टी हरवण्याचा धोका निर्माण झाला आहे. एआयचा वापर करत असताना नैतिकेला सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी या तंत्राचा अत्यंत जबाबदारीने वापर केला पाहिजे.

अतुल नगरकर यांनी माध्यम संशोधनाची प्रक्रिया विशद केली. ते म्हणाले, संशोधक तटस्थ असणे आवश्यक आहे. संशोधन करताना शिस्त आणि संशोधन पद्धती कटाक्षाने अवलंबल्या पाहिजेत. अन्य संशोधकांनी केलेल्या संशोधनाचे संदर्भ देणे आवश्यक आहे. इतरांचे संशोधन आपले म्हणून प्रसिद्ध करणे ही गंभीर बाब असून संशोधकांनी हे टाळले पाहिजे. संशोधनातून नवनिर्मिती होत असल्याने वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने संशोधन करणे हे संशोधकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

जयप्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी स्वागत केले. प्रीती भिसे आणि सायली गणेशकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. आभार श्रावणी कालेकर हिने मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes