SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेत विजेतेपद

schedule07 Mar 26 person by visibility 93 categoryशैक्षणिक

▪️देशपातळीवरील अभियांत्रिकी स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान

इचलकरंजी : हायद्राबाद येथे आयोजित ९ व्या राष्ट्रीय युवा उद्योजक परिषद (एस समिट) २०२६ मध्ये डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत कॉलेज इनोव्हेशन ट्रॅक -१ या गटात विजेतेपद मिळविले. या उल्लेखन्नीय कामगिरीबददल विद्यार्थ्यांना रुपये २५ हजार रोख पारितोषीक प्रदान करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील विभागातील विद्यार्थी अनुज लुगडे, हर्षवर्धन हरगुडे, सोहम बिरनाळे व शर्विल लोखंडे या विद्यार्थ्यांनी डॉ. जी.सी. मेकळके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली इंटेलिजेंट विंडो अ‍ॅटोमेशन सिस्टीम या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळविले आहे.


युथएड फौंडेशन व तेलगंणा इनोव्हेशन सेल (टीजीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत समावेशक उद्योजकता, नवोन्मेष, ब्रँडिंग व सर्जनशिल विचार यांवर विषेश भर देण्यात आला. देशातील २० राज्यांमधील सुमारे ६०० युवा नवोन्मेषक व उद्योजक या परिषदेत सहभागी झाले होते. त्यापैकी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या नाविण्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना सादर केल्या. राष्ट्रीय स्तरावरील पिचिंग सत्रांमध्ये ३२ संघाची निवड करुन त्यांच्या अभिनव कल्पना व उद्योजकीय उत्कृष्टतेचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकसीत करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरुप देणे हा या युवा उद्योजक परिषदेचा मुख्य उददेश होता. या स्पर्धेत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण विचारसणी तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी सादरीकरीत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी घरातील खिडक्यांसाठी मोबाईल वरुन गॅस आणि रेन सेन्सर्स वापरुन खिडकी चालू बंद करण्याचे तंत्र विकसीत करण्यात आले आहे यामध्ये आपत्कालीन स्थितीत घरात आग लागली किंवा गॅस लिक झाला असेल तर खिडकी आपोआप उघडी होवून ती आतल्या हावेला बाहेर वाव दिला जाईल जेणेकरुन होणारा धोका तो कमी करण्यात येईल आणि जर अचानक पाउस आला आणि खिडकी उघडी असेल तर ती खिडकी आपोआप बंद होते जेणेकरुन पाणी घरात येवून होणार नुकसान टाळले जाईल या नविन संशोधनास ज्युरी मेंबर्स नी पसंदी दर्शिवली व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत मागदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.व्ही.आर.नाईक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes